Antarichi Vina

90.00

Category:

Description

मुक्या रसिकांचे मनातील भाव व शब्द बोलका कवी होऊन जयश्री नातू त्यांच्या कवितांतून व्यक्त करतात. त्या इतक्या निसर्गप्रेमी आहेत, की त्यांच्या प्रत्येक कवितेतून निसर्ग डोकावत राहतो. त्या निसगाचं वर्णन करतानाही सदासर्वदा त्यात ईश्वराचं अस्तित्व ठायी ठायी जाणवत असते. या सृष्टीचं सौंदर्य जाणण्यासाठी दृष्टीही सुंदर हवी हे त्या कवितेतच नमूद करतात. त्यांचं तत्त्वचिंतन इतकं सखोल आहे, की अवतीभवतीच्या निसर्गातूनही तेच त्यांना प्रतीत होत राहतं. चंद्र, सूर्य तेच असले तरी प्रत्येक कवीच्या मनात त्याची अशी एक खास दृष्टी असते. हे सर्व काव्यातून अगदी देखणे शब्द लेऊन कविता होऊन येतात. जयश्री नातू यांच्यासारखीच त्यांची कविताही सहज-सोपी, सरळ व सात्त्विक अशी आहे.

Additional information

Weight 0.75 g
Dimensions 5.5 × 0.5 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.