Kirtanacharykram and Shri Hari Sankirta
₹140.00
Description
कलियुगातील जनांच्या कल्याणाकरता देवर्षि नारदांनी नवविधा भक्तींपैकी दुसऱ्या कीर्तन भक्तीच्या प्रचारा व प्रसारासाठी आपल्याला सोपवलेली, ज्ञान व मनोरंजन ह्या दोन्हींचा समन्वय साधून निर्मित केलेली नारदीय कीर्तन पद्धती आहे. हरिकीर्तन हे एक शास्त्र आहे, एक कला आहे व भगवद्भक्तीचे एक सोपान आहे. त्यामुळे हरिकीर्तनकारांवर समाजाला सन्मार्गप्रवण करण्याची फार मोठी जबाबदारी असते. अर्थातच ह्या पद्धतीच्या कीर्तनकारांनी हिच्या सर्व अंगा उपांगांसकट उत्कृष्ट अध्ययन करून नैपुण्य मिळवणं गरजेचंच आहे. त्या दृष्टीने एका जुन्या पठडीतल्या ज्येष्ठ, श्रेष्ठ, नामवंत कीर्तनकाराने नारदीय कीर्तनाच्या समस्त पैलूंबद्दल आजपासून जवळ जवळ शंभर वर्षापूर्वी केलेले ह्या पुस्तकातील मार्गदर्शन सर्वांच्याच आदरास प्राप्त होईल ह्यात काहीच शंका नाही.
Additional information
Weight | 0.135 g |
---|---|
Dimensions | 5.5 × 0.5 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.